फक्त भाजपाच नाही तर काँग्रेस, बसपा, सपा, यांच्यासह डझनभर पक्षांना इव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होतं असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केल आहे. सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपाच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टकेला आहे. लंडनमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत व्हिडिओ लिंकद्वारे सय्यद शुजा हा सायबर एक्स्पर्ट सहभागी झाला असून त्याने भाजपावर आणि इतर पक्षांवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे.

लंडनमध्ये सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर आहेत. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने या परिषदेचे आयोजन केले आहे. २०१४ मध्ये इव्हीएम घोटाळा करण्यात आल्याचा आरोप बऱ्याचदा करण्यात आला आहे. काँग्रेस, आप यांसह सगळ्याच पक्षांनी हा दावा केला होता. आता हाच आरोप कुठेतरी वास्तवात समोर येताना दिसतो आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही कालावधी आधीच हे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

 

Story img Loader