इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रातांची राजधानी असलेल्या मकस्सर शहरात भयंकर बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. मकस्सरमधील एका कॅथेड्रल चर्चसमोर हा स्फोट झाला असून, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. चीनमधील ‘शिनुआनेट’ने हे वृत्त दिलं आहे.
पूर्व इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रातांची असलेल्या राजधानी मकस्सर शहरात रविवारी सकाळी भयंकर बॉम्बस्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कॅथेड्रल चर्चसमोर ही घटना घडली. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहाचे अवयव छिन्न-विच्छन्न झालेले पडले होते. तर यात शेकडो लोक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
“स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांच्या चिंधड्या उडाल्या. अनेक मानवी अवयव घटनास्थळी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मात्र, हे अवयव बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीचे आहेत की अन्य दुसऱ्याचे हे अद्याप निश्चित झालेलं नाही. बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस आयुक्त ई झुलपन यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना दिली.
BREAKING: Bomb explosion occurs outside a Cathedral in Makassar city, east Indonesia, scores of people injured https://t.co/zVFL9EVfZQ pic.twitter.com/byxXZ3IRKu
— China Xinhua News (@XHNews) March 28, 2021
बॉम्बस्फोटातील जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ज्या इमारतीजवळ कार उभी करण्यात आली होती, त्या इमारतीची मोठी हानी झालेली असून, पोलिसांनी परिसराला वेढा दिला असल्याचं स्थानिक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये दिसत आहे.