चीनमधील ह्युबेई येथे गजबजलेल्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवल्याने सहा जण ठार झाले. तर सहा ते सात जण जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी गोळीबार केला असून या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे.

ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात शुक्रवारी सकाळी वेगवान कार अचानक गर्दीत घुसली. नेमके काय झाले हे समजण्याआधीच कारने अनेकांना धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहनचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. अखेर पोलिसांनी चालकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे.

चालकाच्या कारमधून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन त्याने जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अशा स्वरुपाच्या घटना वाढल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.