करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतात कहर सुरू असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाउनची स्थिती असून अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर तर याबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात असून पुन्हा लॉकडाउन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, याबाबतचे अनेक मेसेजही व्हायरल होत आहेत. यावर अखेर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक :-
पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.

pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
sharad pawar
सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीमुळे देशात विदारक स्थिती; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

काय आहे सत्य ?
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात ३ मे ते २० मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे, असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.


पीआयबीच्या स्पष्टीकरणामुळे ३ मे ते २० मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाउन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे.