पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरूवारी दिल्लीमध्ये नवीन संसद भवानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणामध्ये नवीन संसद भवनाचं महत्त्व सांगितलं. नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची दक्षता वाढले आणि काम करण्याच्या त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता येणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान. नव्या संसद भवनाच्या उभारणीवरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
“सध्या देश आर्थिक मंदीच्या छायेतून जात आहे. भाजप सरकार सवल देण्याऐवजी २० हजार कोटी रूपयांची उधळपट्टी करत आहे. यावरून हे सरकार कोणत्याही संवेदना नसलेलं आहे,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली. “सरकारचा हा निर्णय एकाद्याच्या अंतिम संस्कारादरम्यान डीजे वाजवण्यासारखा आहे. एकीकडे कृषी कायद्यांच्या माध्यमातून भाजपनं शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर बलुडोजर चालवला. तर दुसरीकडे ते जनतेचे पैसे संसद भवनाच्या उभारणीवर खर्च करत आहेत. याची कोणतीही आवश्यकता नव्हती. परतु आपल्या अहंकाराला संतुषअट करण्यासाठी त्यांच्याकडून असे प्रकार केले जात आहेत,” असंही ते म्हणाले.
At a time when Nation is going thru economic recession”, BJP Govt instead of giving concession is taking out ₹20000 Crore worth extravaganza procession which proves that it is a shameless & heartless Govt #NewParliamentBuilding #CentralVistaProject
— Jaiveer Shergill (@JaiveerShergill) December 10, 2020
आणखी वाचा- ‘आत्मनिर्भर’ संसद भवनाची डिझाइन पेंटागॉनसारखी, फोटो शेअर करत जयराम रमेश यांनी लगावला टोला
सेंट्रल विस्ता प्रोजेक्टद्वारे संसद भवनाचं भूमिपूजन करणं म्हणजे शेतकऱ्यांचं अन्न काढून घेऊन केकचं दुकान उघडण्यासारखं असल्याचंही शेरगिल म्हणाले. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाला ‘आत्मनिर्भर’ म्हणण्यावरुन काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला.
Laying foundation stone of #NewParliamentBuilding at a time when farmers are protesting to save their basic thali is equivalent to “playing DJ music inside a funeral ground” #CentralVista
— Jaiveer Shergill (@JaiveerShergill) December 10, 2020
जयराम रमेश यांनी ‘आत्मनिर्भर’ संसदेचं डिझाइन वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉन प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही इमारतींचं साम्य दाखवण्यासाठी त्यांनी दोन्ही इमारतींचे फोटोही शेअर केलेत. “इंग्रजांनी बनवलेल्या सध्याच्या संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन आत्मनिर्भर संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे,” अशा आशयाचं ट्विट करत जयराम रमेश यांनी टोला लगावला. जयराम रमेश यांनी सध्याच्या संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिराचेही फोटो शेअर केले आहेत.