करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेत काय स्थिती असेल याबाबत अंदाज बांधले जात आहेत. मात्र दुसऱ्या लाटेतच लहान मुलांना करोनाची लागण होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. कर्नाटकात लहान मुलांमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधीच भीती वाढली आहे.

कर्नाटकमध्ये मागच्या १५ दिवसात १९ हजाराहून अधिक मुलांना करोनाची लागण झाली आहे. तर दिल्लीत दोन मुलांचा करोनाने बळी घेतला आहे. करोनाची पहिली लाट ९ मार्च ते २५ सप्टेंबर २०२० पर्यंत होती. पहिल्या लाटेत १० वर्षाखालील १९,३७८ मुलांना तर ११ ते २० वयोगटातील ४१,९८५ जणांना करोनाची लागण झाली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसत आहे. मागच्या १५ दिवसात जवळपास १९ हजार मुलांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

“पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र”; काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा भाजपाचा आरोप

मुलांमधील वाढतं संक्रमण पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून सरकारला इशारा दिला आहे. मुलांच्या आरोग्याविषयी योग्य धोरण आखण्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितलं आहे. देशाच्या भविष्यासाठी सरकारला झोपेतून जागं होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास, थकवा, गळ्यात होणारी खवखव, वास जाणं, तोंडाला चव नसणं यासारखी लक्षणं दिसून आली आहेत.