अमेरिकेत कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अधिक माहिती मागवली होती. भारत बायोटेक लि. या कंपनीच्या भागीदार असलेल्या ऑक्युजेन या कंपनीने सर्व माहिती असलेला एक संच फाईलच्या स्वरूपात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन खात्याला सादर केला होता.

भारतात निर्मिती करण्यात आलेल्या कोव्हाक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी अमेरिकन औषध नियामक एफडीएने मंजूरी दिली नाही. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपत्कालीन उपयोग प्राधिकरण (ईयूए) अंतर्गत वापर करण्यासाठी नकार दिला आहे. भारत बायोटेकची अमेरिकन भागीदार असलेल्या ओकुजेन कंपनीने यांनी एफडीएकडे लसीच्या आपत्कालीन वापरासाठी साठी अर्ज केला होता. अमेरिकेने आता या लसीच्या वापरवार बंदी आणल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

Corona: भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

आपत्कालीन वापरासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता

अमेरिकेच्या एफडीएने यापूर्वी कोविड -१९च्या कोणत्याही नविन लसीसाठी आपत्कालीन उपयोग प्राधिकरण (ईयूए) अंतर्गत परवानगी देण्यात येणार नाही अशी माहिती याआधी देण्यात आली नव्हती असे भारत बायोटेकने म्हटले आहे. अमेरिकेने कोव्हॅक्सिनच्या वापरावर बंदी आणल्याने आपत्कालीन वापरासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. एफडीएच्या सल्ल्यानुसार कोव्हॅक्सिनसाठी बीएलएकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बीएलए अंतर्गत औषधे आणि लसींना मान्यता देण्यात येते असे ओकुजेनने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिकारशक्ती वाढल्याने आणि मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झाल्याने अमेरिकेत या रोगाची साथ कमी होत आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या एफडीएने यापूर्वी कोविड -१९च्या कोणत्याही नविन लसीसाठी आपत्कालीन उपयोग प्राधिकरण (ईयूए) अंतर्गत परवानगी देण्यात येणार नाही अशी माहिती दिली नव्हती असे भारत बायोटेकने म्हटले आहे.

मुंबईस्थित हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी १५९ कोटींचं अनुदान!

भारतासाठी मोठी संधी

अमेरिकतील भागीदार ओकुजेनने एफडीए कडून कोव्हॅक्सिनला बायलॉजिक्स लायसन्स अ‍ॅप्लिकेशन (बीएलए) पाठविण्याची शिफारस मिळवली आहे असे भारत बायोटेकतर्फे सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनसाठी १४ देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर ५० हून अधिक देशांमध्ये ही प्रक्रिया सुरु आहे. भारतात निर्मिती करण्यात आलेल्या कोणत्याही लसीला अमेरिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. जर परवानगी मिळाली तर भारतासाठी ही मोठी संधी असणार आहे असे भारत बायोटेकने म्हटले आहे.

कोव्हॅक्सिनची चाचणी भारतात करण्यात आल्यानंतर ३ जानेवारी रोजी आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर कोव्हॅक्सिन लस भारतात लसीकरणासाठी वापरली जात आहे.