उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी मोदी सरकारला दोष देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही (संकट) आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं शफीकुर्र रहमान म्हणालेत.

शफीकुर्र रहमान यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलांना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे करोनासारखं आसमानी संकट देशात आलं आहे. मात्र या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी बलात्कारासंदर्भातील आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी मांडल्याचा दावा केलाय. शफीकुर्र रहमान यांनी आधी लस टोचून घेण्यासही विरोध केला होता. मात्र आता त्यांनी लसीकरणासाठी होकार दिलाय.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

नक्की वाचा >> बापरे! एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; तीन तास सुरु होतं ऑपरेशन

संभल लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार असणाऱ्या शफीकुर्र रहमान यांनी एस. टी. हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करताना मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. भाजपा सरकारने सात वर्षाच्या कार्यकाळात शरीयत कायद्यामध्ये छेडछाड केल्याने करोनाची महासाथ आणि चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं देशात आल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी वादात भर टाकणारं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

करोना हा काही आजार नसल्याचं मी मागील वर्षीच म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर इलाज असता, पण असं करोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा करोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग असल्याचं शफीकुर्र रहमान म्हणालेत. “आम्ही मुस्लिमांना मशीदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत,” असंही शफीकुर्र रहमान म्हणाले.