पाश्चिमात्य परंपरा ही आपल्या संस्कृतीचा भाग नाही, त्यामुळे व्हॅलेण्टाइन डे साजरा करू नये, असे आवाहन पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जनतेला केले आहे.
व्हॅलेण्टाइन डेचा आपल्या संस्कृतीशी संबंध नाही, पाश्चिमात्यांच्या परंपरांचे अंधानुकरण केल्याने आपल्या मूल्यांचा ऱ्हास होतो आणि त्यामुळे महिलांवर हल्ले होण्यासारख्या घटना वाढतात, असेही हुसेन म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीतील नेते सरदार अब्दुर रब निश्तर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पाकिस्तानातील महान नेत्यांच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब केल्यास देशाची प्रगती होईल, असेही ते म्हणाले. पेशावर आणि कोहत जिल्ह्य़ातील स्थानिक परिषदेने या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हुसेन यांनी वरील आवाहन केले आहे.

Story img Loader