सिलचर-तिरुवनंतपुम सुपरफास्ट एक्सप्रेसच्या तीन डब्ब्यांना रविवारी आग लागली. ही रेल्वे सिलचरहून निघणार होती व त्या अगोदर ती पीट लाईनवर उभी होती. अचानक रेल्वेला आग लागल्याने धुरांचे लोट बाहेर येऊ लागले. हे पाहून रेल्वे स्थानकावकर उपस्थित प्रवाशांची धांदल उडाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी सांगितल्या प्रमाणे, सुरूवातीस एकाच डब्ब्यातून आगचे लोट बोहेर येताना दिसत होते. मात्र यानंतर हळूहळू अन्य डब्ब्यांना देखील आग लागली. आगीचे आकाशकडे उडणारे मोठमोठाले लोट पाहिल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण तयार झाले व त्यांची पळापळ सुरू झाली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखील नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच सिलचर अग्निशामक विभाम व राज्य आपत्ती नियंत्रण दल (एसडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू झाले. आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आल्यावर या घटनेची चौकशी होईल असे एका अधिका-याने सांगितले.