सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन झालं आहे. सोमवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल होतं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अशोक देसाई यांनी १९५६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली होती. ८ ऑगस्ट १९७७ रोजी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ९ जुलै १९९६ ते ६ मे १९९८ पर्यंत ते भारताचे अॅटर्नी जनरल होते. २००१ मध्ये त्यांचा पद्मविभूषण तसंच लॉ ल्युमिनेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अशोक देसाई १९६४ मध्ये लॉ कॉलेज बॉम्बे येथे प्रोफेसर होते. तसंच १९६७ ते १९७२ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑप जर्नलिझम येथे ते लेक्चरर म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक पुस्तकंदेखील लिहिली आहेत. तसंच त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
Former Attorney General & Solicitor General of India Ashok Desai passed away early this morning. He served the nation with distinction in these capacities. His affable presence will be missed by all who knew him. My heartfelt condolences to the family he left behind.
— Mahesh Jethmalani (@JethmalaniM) April 13, 2020
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट केलं आहे. अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचे निधन झाले. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भावपूर्ण श्रद्धांजली”.
सुप्रीम कोर्टातले जेष्ठ वकील,भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचे निधन झाले. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 13, 2020
ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी अशोक देसाई एक मोठं व्यक्तिमत्व होतं असं सांगत श्रद्धांजली वाहिली आहे.