माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा २१ वर्षीय मुलगा बंडारू वैष्णव याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकत असलेल्या बंडारू वैष्णवने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सिकंदराबाद येथील गुरूनानक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी उशिरा त्याचे निधन झाले. बंडारू दत्तात्रय तेलंगणातील सिकंदराबादचे भाजपा खासदार आहेत. ते मोदी सरकारमध्ये वर्ष २०१४ ते १ सप्टेंबर २०१७ पर्यंत श्रम आणि रोजगार मंत्री होते.

बंडारू दत्तात्रय हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. त्यावेळीही ते श्रम आणि रोजगार मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील विविध भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये भाजपाचा विस्तार करण्यात बंडारू दत्तात्रय यांचे मोठे योगदान आहे.

Story img Loader