गुजरात एटीएसनं केलेल्या मोठ्या कारवाईत चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर येथून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे.

गुजरात एटीएसनं कारवाईनंतर घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. आरोपी मनिष संघांनी (पटेल, वय ४२) हा मोरबी जिल्ह्यातील हळवद तालुक्यातील घनश्यामगढ येथील रहिवाशी आहे. आरोपी संघांनी याच्या कारमध्ये या नोटा सापडल्या आहेत. गांधीनगरमधील सेक्टर २८मध्ये एटीएसनं ही कार पकडली. त्यानंतर तपासणी केली असता, त्यात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. तब्बल ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख रुपये इतकं आहे.

आणखी वाचा- सहा प्लॉट, दोन घरं, एक इमारत, १५ लाख रोख…; सहाय्यक पोलीस आयुक्तांची संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

यापूर्वी जुलै महिन्यात एटीएसनं अशीच एक कारवाई केली होती. २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एटीएसनं दोन जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४ कोटी ७६ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. गोंध्रातील पंचमहलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.

Story img Loader