केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला एका वेगळ्याचा आव्हानाचा सामना करावा लागत आहे. इंदिरा पर्यावरण भवनाच्या प्रारंगणात असलेल्या बागेमध्ये पक्षी विष्ठा करत असल्याने तेथे असलेल्या विविध जातीच्या फुलांवर परिणाम होत आहे. बुधवारी मंत्रालयाने इमारतीच्या मध्यवर्ती अंगणातील पक्षांच्या विष्ठेच्या वारंवार होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रस्ताव सांगण्याचे आवाहन केले आहे. जो व्यक्ती किंवा संस्था सर्वोत्तम उपाय सांगेल त्याला १ लाख रुपये देण्यात येतील असे पर्यावरण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

“संस्था / कंपन्या / तंत्रज्ञानाची माहिती असणार्‍या आणि पूर्वीच्या अनुभवातील व्यक्ती यावर उपाय देऊ शकतात, जे पर्यावरणास अनुकूल, तांत्रिकदृष्ट्या योग्य, अंमलबजावणी योग्य, संभाव्य कमी खर्चिक आणि श्रमिक सुरक्षेची हमी देणारे असेल,” असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. तसेच बागेमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता हे उपाय अमलात यायला हवेत असेही मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

हिंदुस्ता टाईम्सच्या वृत्तानुसार, पर्यावरण मंत्रालयाची समिती तीन सर्वोत्तम उपायांची यादी करेल. इच्छुक परिसराची माहिती हवी असल्यास १६ जुलै पर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते संध्याकाळी ४ दरम्यान नवी दिल्लीच्या जोर बाग येथे इंदिरा पर्यावरण भवन येथे भेट देऊ शकतात. उपाय सादर करण्याची शेवटची तारीख २३ जुलै आहे.

माझ्यासाठी ही बातमी आहे. पक्षांच्या विष्ठेचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय प्रस्ताव मागवित आहे याची मला कल्पना नव्हती. येथे बरेच पक्षी आहेत – कबूतर, कावळे, पोपट आणि मैना. कदाचित ते कबूतरांच्या विष्ठेच्या समस्येचा संदर्भ देत आहेत. खरं सांगायचं झालं तर मी कामावर असताना पक्षाची विष्ठा कधीच माझ्या अंगावर पडलेली नाही, ”असे पर्यावरण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.