भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टीक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे. ही अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे,” असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक अ‍ॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक
Delhi Schools Receive Bomb Threat
Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का
Senior citizen duped by cyber fraudster in pune
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक
Loksatta explained Is the risk of HMPV increasing
विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
33 Bangladeshi infiltrators arrest in Pimpri-Chinchwad in year
पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!

फोटोगॅलरी >> ‘ही’ आहेत कोट्यवधी भारतीयांनी डाऊनलोड केलेली टॉप दहा Made In China Apps

परदेशामध्ये बंदी घालण्यात आलेल्या काही व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्ससंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिलमध्येच इशारा जारी केला होता. राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला होता. वापरकर्त्यांच्या म्हणजेच युझर्सच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार न करणाऱ्या मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासंदर्भातील मागणी वेळोवेळी केली जाते. मात्र हे असे आरोप कंपन्यांकडून फेटाळले जातात. चीनमधील बाइट डान्स या कंपनीच्या मालकीच्या टीक-टॉक अ‍ॅपवर मागील काही काळामध्ये माहिती मिळवण्यासंदर्भातील आरोपांबरोबर युझर्सच्या खासगी माहितीबद्दल ठोस धोरण नसल्याचे आरोप करण्यात आले. मात्र कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

कंपन्यांकडून आरोप फेटाळण्यात येत असले तरी चिनी कंपन्यांशी संबंधित अ‍ॅण्ड्रॉइड तसेच आयओएस अ‍ॅप्स धोकादायक असल्याचे सांगण्यात येते. चिनी कंपन्यांनी बनवलेले किंवा चीनमधील कंपन्यांच्या मदतीने बाजारामध्ये दाखल झालेले अ‍ॅप्स हे हेरगिरी तसेच मालवेअर पसरवण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता अनेकदा व्यक्त कऱण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांसंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींने हे अ‍ॅप्स वापरु नयेत अशा संदर्भातील सूचनाही करण्यात आल्याच्या बातम्याही मागील काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. माहिती सुरक्षित राहण्यासंदर्भात साशंकता निर्माण होत असल्याने असे अ‍ॅप्स वापरु नये असं सांगण्यात आलं होतं.

पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.

ही पाहा अ‍ॅप्सची यादी

TikTok

Vault-Hide

Vigo Video

Bigo Live

Weibo
WeChat

SHAREit

UC News

UC Browser

BeautyPlus

Xender

ClubFactory

Helo

LIKE

Kwai

ROMWE

SHEIN

Zoom

NewsDog

Photo Wonder

APUS Browser

VivaVideo- QU Video Inc
Perfect Corp

CM Browser

Virus Cleaner (Hi Security Lab)

Mi Community

DU recorder

YouCam Makeup

Mi Store

360 Security

DU Battery Saver

DU Browser

DU Cleaner

DU Privacy

Clean Master – Cheetah

CacheClear DU apps studio

Baidu Translate

Baidu Map

Wonder Camera

ES File Explorer

QQ International

QQ Launcher

QQ Security Centre

QQ Player

QQ Music

QQ Mail

QQ NewsFeed

WeSync

SelfieCity

Clash of Kings

Mail Master

Mi Video call-Xiaomi

Parallel Space

Story img Loader