भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज भारतात व संबंध देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या महामानवाच्या जीवनपटावर एक नजर –
१४ एप्रिल , १८९१ – महू, मध्यप्रदेश येथे सेनिक छावणीत जन्म.
१९०७ – डॉ. आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली.
१९०७ – रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह.
१९१० – इन्टरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण.
१९१२ – बी.ए.परीक्षा उत्तीर्ण.
१९१२- पुत्र यशवंतराव यांचा जन्म.
२ फेब्रुवारी, १९१३ – वडील सुभेदार रामजी यांचे निधन.
१ जून, १९१३ – सयाजीराव गायकवाड यांनी विदेशातील अध्ययनासाठी शिष्यवृत्ती बहाल केली.
१९१३ – उच्च शिक्षणाकरिता न्यूयॉर्क(अमेरिका) येथे रवाना.
१९१५ – अॅन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम.ए.ची उपाधी बहाल.
जून १९१६ – नॅशनल डिविडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिक अॅंड अनालिटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्वीकृत.
१९१६ – कास्ट इन इंडिया, देअर मेकेनिझम जेनेसिस अॅंड डेव्हलपमेंट या निबंधाचे वाचन.
१९१६ – पीएच.डी. पदावी बहाल.
११ नोव्हेंबर १९१८ – सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती.
३१ जाने. १९२० – राजर्षी शाहू यांच्या साहाय्याने मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१ मार्च १९२० – माणगाव ( कोल्हापूर) येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद.
१ मे १९२० -अखिल भारतीय बहिष्कृत परिषद, नागपूर
१९२२ – बॅरीस्टर परीक्षा पास
१९२३ – डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल.
२० जुलै १९२४ – बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना, मुंबई
जुलै, १९२६ – राजरत्न या मुलाचे निधन
१९ मार्च १९२७- कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद , महाड
३ एप्रिल १९२७ – बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन
१९२७ – मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड.
४ सप्टेंबर १९२७ – समाज समता संघची स्थापना.
१२ नोव्हेंबर १९२७ – डॉ. आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन.
१३ नोव्हेंबर १९२७ – अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह.
२५ डिसेंबर १९२७ – महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन
जून, १९२८ – मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक.
२९ जून, १९२८ – समता पाक्षिकाचा आरंभ
२३ ऑक्टो.१९२८ – सायमन कमिशनपुढे साक्ष
१९२९ -अस्पृश्यांसाठी ३३ टक्के आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधिमंडळात भाषण.
३ मार्च १९३० – काळाराम मंदिर, नाशिक सत्याग्रह प्रारंभ
२ ऑक्टो. १९३० – लंडन येथे गोलमेज परिषदेसाठी मुंबई येथून रवाना.
नोव्हेंबर.१९३० -गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची बाजू ठामपणे मांडली.
२४ नोव्हेंबर १९३० – जनता या साप्ताहितकाचा आरंभ.
१४ ऑगस्ट १९३१ -मणीभवन मुंबई येथे गांधीजींसोबत पहिली भेट.
८ ऑक्टो. १९३१ – अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबात गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
२६ नोव्हेंबर १९३१ – गांधी – आंबेडकर-पंचम जॉर्ज यांची भेट.
२५ सप्टेंबर १९३२ – पुणे करारावर स्वाक्षरी.
२७ मे १९३५ – पत्नी रमाबाई यांचे निधन
२ जून १९३५ – मुंबई , विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावर नियुक्ती
१३ ऑक्टोबर १९३५ – येवला, ‘ हिंदू म्हणून जन्माला आलो , पण हिंदू म्हणून मरणार नाही’. डॉ. आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.
मे, १९३६ – जातिप्रथेचे उन्मूलन भाषण प्रकाशित.
३१ मे, १९३६ -‘मुक्ती कोन पथे’ विख्यात भाषण, मुंबई
१५ ऑगस्ट , १९३६ – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
१७ फेब्रुवारी १९३७ – मुंबई असेंब्ली निवडणूक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी.
१७ सप्टेंबर १९३७ – कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात बिल मांडले.
४ जाने १९३८ – पंढरपूर, मातंग परिषदेतर्फे मानपत्र अर्पण
१२-१३ फेब्रु.१९३८ – मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
मे १९३८ – मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा.
सप्टेंबर १९३८ – औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
७ नोव्हेंबर १९३८ – स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह.
जानेवारी, १९३९ – महाड, शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद-कॉंग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका.
२२ जून १९४० – मुंबई, सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट.
१९४० – थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथाचे प्रकाशन.
एप्रिल १९४२ – अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना.
१९ जुलै १९४२ – भारतीय दलित वर्ग परिषद, नागपूर येथे हजर.
१९४२ – मजूर मंत्री म्हणून निवड.
१९ जाने १९४३ – पुणे विख्यात भाषण रानडे, गांधी आणि जिन्ना.
जून , १९४५ – कॉंग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले? ग्रंथ फ्रकाशित
२० जून १९४६ – मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
१९४६ – शूद्र पूर्वी कोण होते ? हा ग्रंथ प्रकाशित.
१७ डिसेंबर १९४६ – भारताला कोणतीही शक्ती एकात्मक होण्यापासून परावृत्त करु शकत नाही. संविधान सभेत भाषण.
ऑगस्ट १९४७ – भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश.
२९ ऑगस्ट १९४७ – संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड.
१५ एप्रिल १९४८ – डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत विवाह.
ऑक्टो – १९४८ – दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित .
सप्टेंबर , १९४८ – सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्यासोबत भेट.
४ नोव्हें. १९४८ – घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला.
२५ नोव्हेंबर १९४९ – घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण.
२६ नोव्हेंबर १९४९ – घटना समितीने घटना स्वीकार केली.
मे, १९५० – बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध.
२५ मे, १९५० – कोलंबोत विश्व बौद्ध परिषदेला उपस्थित.
१९ जून १९५० – औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन
मे, १९५१ -लोकप्रतिनिधित्व विधेयक लोकसभेपुढे मांडले.
सप्टें. १९५१ – हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिकामध्ये प्रकाशित.
२७ सप्टे. १९५१ – हिंदू कोड बिल व मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्रिपरिषदेचा राजीनामा.
जानेवारी , १९५२ – प्रथम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव
मार्च , १९५२ – राज्यसभेसाठी निवड.
५ जून १९५२ – कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी अर्पण.
१२ जाने. १९५३ – हैद्राबाद, उस्मानिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी अर्पण.
३० जाने. १९५४ – महात्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहूर्त समारंभास उपस्थित.
मे, १९५४ – भंडारा पोटनिवडणुकीमध्ये पराभव.
३ ऑक्टो. १९५४ – आकाशवाणीवर ‘माझे वैयक्तिक तत्त्वज्ञान’ भाषण.
२८ ऑक्टो १९५४ – माझे आयुष्य तीन गुरुंनी आणि तीन उपास्य दैवतांनी घडले.
डिसेंबर , १९५४ – रंगून , तिस-या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित.
४ मे , १९५५ – भारतीय बौद्ध महासभा स्थापित.
४ फेब्रु. १९५६ – मुंबई ही महाराष्ट्राची आहे, अशी ताकीद भारत सरकारला दिली.
२४ मे १९५६ -नरेपार्क येथे, ऑक्टोबर महिन्यात मी बौद्धधर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा केली.
१४ ऑक्टो. १९५६ – नागपूर येथे पूज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत धम्मदीक्षा घेतली व नंतर आपल्या ५ लाख अस्पृश्य बंधूंना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
१५ ऑक्टो १९५६ – बौद्ध धम्म का स्वीकारला या विषयी सकाळी अभूतपूर्व भाषण व नागपूर म्युनिसिपालिटीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पण.
१६ ऑक्टो १९५६ – चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश्य बंधूंना धम्मदीक्षा दिली.
२० नोव्हे. १९५६ – काठमांडू , नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध आणि कार्लमार्क्स हे अभूतपूर्व भाषण दिले.
६ डिसेंबर – १९५६ – दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण.
७ डिसेंबर १९५६ – मुंबई येथे दादर चौपाटीच्या किना-यावर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार.
(लोकराज्यच्या एप्रिलच्या अंकातून साभार)