करोनामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील स्थिती कोणत्या टोकाला गेली आहे, हे सगळ्यांनाच दिसून येत आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडत आहे. पण, एक दिलासा येणारी निरीक्षण एका अभ्यासातून समोर आलं आहे. ते म्हणजे करोनाच्या संसर्गाचा वेग मंदावला आहे. हो, चेन्नईतील मॅथेमॅटिकल सायन्स इन्स्टिट्यूटमधील (गणित विज्ञान संस्था) प्राध्यापकांनी केलेला पाहणीतून हे दिसून आलं आहे. लॉकडाउन लागू झाल्यानंतर हा फरक दिसून आला आहे. त्यामुळे लॉकडाउन करोनाचा वेग रोखण्यास फायदेशीर ठरला असल्याचंच दिसून आलं आहे.

मार्च महिन्याच्या मध्यावधीनंतर करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली. एप्रिल सुरू झाल्यानंतर करोनाच्या प्रसाराचा वेग वाढला असल्याचं आकडेवारीतून येतून दिसून आलं. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या टेन्शन वाढलं होतं. लॉकडाउन असतानाच्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यानं भीतीच वातावरणही तयार झालं होतं. मात्र, लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसाराचा वेग काहीअंशी मंदावला असल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
चेन्नईतील मॅथेमॅटिकल सायन्स इन्स्टिट्यूटमधील सौमया ईश्वरन आणि सीताभ्रा सिन्हा यांनी करोनाच्या प्रसारासंदर्भातील आकडेवारीचा अभ्यास केला. यात करोनाच्या प्रसाराच्या वेगावर लॉकडाउनचा परिणाम झाल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आगामी काळात संसर्ग होणाऱ्यांची संख्याही घटणार असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउन सुरू ठेवल्यास २० एप्रिलपर्यंत २० हजारपेक्षा कमी लोकांना संसर्ग होऊ शकतो. तर लॉकडाउन वाढवला नाही, तर ही संख्या ३५ हजारांच्या जवळपास असेल, असं असा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे.

सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली एका गटानं यासंपूर्ण आकडेवारीचा विश्लेषण केलं. यात भारतात ४ मार्चनंतर करोनाचा उपद्रव झाल्यानंतरच्या आतापर्यंतच्या कालावधीत ६ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान या काळात करोनाच्या प्रसाराचा वेग आधीच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून आलं आहे. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात एक करोनाग्रस्त रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याच प्रमाण १.८३ टक्के होतं. ते ६ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात कमी झालेलं दिसून आलं. एका रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याचं प्रमाण १.५५ टक्के इतकं नोंदवण्यात आलं. याविषयी बोलताना सिन्हा म्हणाले,’हे ठामपणे सांगणं थोडं घाईचं होईल. पण, प्रसाराच्या वेगात जी घट झाली आहे, तो लॉकडाउनचाच परिणाम आहे,’ असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील स्थिती कशी?

देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीविषयी बोलताना सिन्हा म्हणाले, ‘महाराष्ट्रातील करोनाच्या प्रसाराच्या वाढीत ६ एप्रिलच्या मागेपुढेघट झाली आहे. पण, आता असं दिसून येत आहे की, घट खूपच कमी आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील करोनाच्या प्रसाराचा वेग खूप दिसून दिसून येत आहे,’ असं सिन्हा यांनी सांगितलं.