काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या पक्षाला मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या जाहीर सभांमधून काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी जनतेला दिलासा देणाऱ्या योजनांचा ते पाऊस पडत आहेत. राहुल गांधी यांच्या या घोषणांवर विचारवंत मधु किश्वर यांनी निशाणा साधला आहे. मात्र, यावरून किश्वर याच अडचणीत आल्या असून सोशल मीडियावर त्यांच्यावरच टीका होताना दिसत आहे. आता तो दिवस दूर नाही की राहुल गांधी देशातील प्रौढ पुरूषांना फ्री सेक्सची सुविधाही देतील, असे किश्वर यांनी ट्विट केले होते. त्यांच्या याच ट्विटवरून त्या ट्रोल झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किश्वर यांनी एका ओपिनियन ट्विटला उत्तर देताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, काँग्रेसने दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना मोफत तांदूळ/गहू देण्यासाठी खाद्य सुरक्षा विधेयक आणले होते. जर मनरेगा आणि खाद्य सुरक्षा विधेयक पुरेसे नसेल तर निश्चितपणे काहीतरी चुकीचे आहे. हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांसाठी किमान उत्पन्नाची घोषणा केल्यानंतर केले होते.

किश्वर यांच्या ट्विटवरील काही प्रतिक्रिया..