करोना महामारीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्कचा वापर करणं यामुळे खरंतर अनेकांचे प्राण वाचले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र यामुळेच लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचं आता समोर आलं आहे. इंग्लंडमधल्या काही तज्ज्ञांनी याबद्दलचा अभ्यास केला आहे.

इंडिया टुडेने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या जवळपास १५ महिन्यांपासून ज्या मुलांना कोणत्याही संसर्गजन्य फ्लुची लागण झालेली नाही, अशा मुलांमध्ये त्याच्याशी लढण्यासाठीची रोगप्रतिकाशक्ती तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांचं शरीर अशा पद्धतीच्या संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यासाठी सक्षम नाही.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांना RSV या फुफ्फुसांच्या संसर्गाच्या धोक्याची शक्यता वाटत आहे. या संसर्गामुळे फुफ्फुसांना धोका निर्माण होतो आणि मृत्यूचा धोकाही संभवतो. एक वर्षे वयाच्या आतील मुलांना हा संसर्ग होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
त्यांनी असंही सांगितलं की, करोना प्रादुर्भावाच्या पूर्वी अनेक लहान मुलांना अशा प्रकारचा संसर्ग झाला आहे. मात्र, करोनाकाळात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्यामुळे अशा संसर्गापासून मुलांचं संरक्षण झालं.

मात्र भविष्यात ज्यावेळी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं बंद होईल, त्यावेळी लहान मुलांना पुन्हा RSV संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. कारण, या करोनाकाळात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्याने लहान मुलांना इतर संसर्गजन्य आजार झाले नाहीत आणि त्यामुळे त्या आजारांशी लढण्यासाठी त्यांच्या शरीराने रोगप्रतिकारशक्ती तयार केलीच नाही.