अम्फन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भारतातील ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांतील लोकांच्या मदत व बचाव कार्यासाठी मदतीचा पहिला हप्ता म्हणून एका भारतीय-अमेरिकी स्वयंसेवी संस्थेने १० हजार डॉलरची रक्कम जाहीर केली.
अम्फन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना सर्व प्रकारची मदत पुरवण्यास आम्ही बांधील असल्यामुळे आम्ही ही रक्कम जारी केली आहे, असे सेवा इंटरनॅशनल या संस्थेने सांगितले. या चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना सर्व मदत करणे ही या वेळेची गरज आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष स्वदेश कटोच म्हणाले.
गेल्या दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली असलेल्या अम्फन चक्रीवादळाने आतापर्यंत ८५ लोकांचा बळी घेतला असून, सुमारे दीड कोटी लोकांना त्याचा फटका बसला आहे. भारतात या चक्रीवादळामुळे १० लाखांहून अधिक घरे नष्ट झाली आहेत.