अटकेमध्ये असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळच्या अकरा साथीदारांची ओळख राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पटली असून त्यांनी नावे जाहीर करण्यात आली आहेत.
देशभरातील दहशतवादी हल्ल्यांमागे या सर्वांचा हात असल्याचे एनआयएने सांगितले आहे.
त्यातील सातजण कर्नाटकातील तर, उर्वरित अझामग्रहामधले आहेत. त्यांची एनआय़एमध्ये भरती करण्यामागे यासिनचे प्रोत्साहन त्यांना मिळत होते. असेही एनआयएचे म्हणणे आहे.
या सर्वांच्याविरुद्ध अजामीनपात्र आदेशासाठी एनआयए दिल्ली न्यायालयात जाणार असल्याचेही समजते.
एनआयएने त्यांची नावे जाहीर केलेली आहेत- सुल्तान आरमर, शाफी आरमर, मोद हुसैन फरहान, अफीफ मोटा, सलीम इशाकी, अल्वर अलिस नूर आणि अब्दुल वाहीद सिद्दीबापा हे कर्नाटकातील तर, अबू रशिद शेख, मोद रशीद, सादाब अहमद, हैदर अली हे आझामग्रहातील असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तसेच यांचा २७ ऑक्टोबर रोजी बोधगयामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याचाही संशय आहे. हे सर्व सध्या पाकिस्तानात असल्याची शक्यताही एनआयएने वर्तविली आहे.