महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या कर्नाटकातही नाईट कर्फ्यूचा आदेश लागू करण्यात आला होता. पण आता कर्नाटकमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीवरुन नाईट कर्फ्यूचा आदेश मागे घेत असल्याने कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

रात्री ११ ते सकाळी पाच या वेळात कर्नाटकात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. विरोधी पक्षाने या मुद्यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.

रात्री करोना पसरतो, दिवसा नाही का? असा प्रश्न महाराष्ट्रात विरोधकांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्रात रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेंची बोचरी टीका
“करोना हा फक्त रात्रीच परसतो का? दिवसा पसरत नाही का? सरकारकडून जनतेला कोणतंही आर्थिक सहाय्य दिलं जात नाहीये. उलट माफ केलेले कर पुन्हा वसूल केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फी भरायच्या आहेत. वीज बिलाच्या दरात वाढ करून ठेवली आहे. सरकार म्हणून तुम्ही जनतेला काहीच दिलासा देत नाही. अमेरिकेप्रमाणे हे सरकार आर्थिक पॅकेज महाराष्ट्रातील जनतेसाठी जाहीर करत नाहीच, पण याउलट संचारबंदी करून लोकांना त्यांच्या उपजिविकेसाठी कामही करू दिलं जात नाहीये. अशा परिस्थितीत जनतेने पैसे आणयचे कुठून?”, असा सवाल त्यांनी टीव्हीनाइनशी बोलताना उद्धव ठाकरे सरकारला केला. याचवेळी बोलताना, “सरकार स्वत: भिकारी आणि लोकांना भिकारी बनवायचे चाळे सुरू”, अशी टीका त्यांनी केली.

Story img Loader