आधीच सामान्य माणूस करोनाच्या संकटाशी झगडतोय, त्याच्याशी लढा देतोय. या सगळ्या संकटात त्याला इंधन दरवाढीचा शॉक नको अशा आशयाचं वक्तव्य बसपाच्या नेत्या मायावती यांनी केलं आहे. एकीकडे करोनाचं संकट सामान्य माणसाला सहन करावं लागतंय, दुसरीकडे इंधन दरवाढ केली जाते आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आणखी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- इंधन दरवाढीतून मोदी सरकारने सुरु केलेली नफेखोरी थांबवावी -राहुल गांधी

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर चांगलेच वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आता बसपाच्या मायावतींनी लवकरात लवकर केंद्र सरकारने इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘या’ मुद्द्यावर मायावतींनी दिला भाजपाला जाहीर पाठिंबा

चीनवरुन घाणेरडं राजकारण

भाजपा आणि काँग्रेसच्या राजकारणावर टीका करताना मायावती म्हणाल्या, “चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे. यांच्या परस्परांच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.”