करोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाली आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.

बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल. यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर ८ राज्यात एक जानेवारीपासून या योजना आमंलात आली होती. आता उर्वरीत सर्व राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

काय आहे ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना?
वन नेशन ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही मोदी सरकारची महत्त्वांकाक्षी योजना आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरुन धान्य घेऊ शकतो. समजा एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे. तो परप्रांतीय आहे. तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे. या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते. कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फिड करण्यात आली आहे.

दहा नंबरचा रेशन कार्ड क्रमांक –
केंद्र सरकार राज्यांना दहा अंकाचे रेशन कार्ड क्रमांक जारी केल. या क्रमांकाच्या आधीचे दोन क्रमांक राज्याचे कोड असतील आणि त्यानंतरचे दोन नंबर रेशन कार्ड क्रमांक असेल.

आणखी वाचा- प्रवाशांनो लक्ष द्या….आजपासून २०० रेल्वे धावणार, प्रवासापूर्वी वाचा नियम

भ्रष्टाचाराला आळा बसणार ?
या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

जुन्या रेशन कार्डचे काय होणार?

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाल्यानंतरही जुने रेशन कार्ड सुरूच राहणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. फक्त जुन्या रेशन कार्डला नियमांनुसार अपडेट करण्यात येईल. ज्याद्वारे पुर्ण देशात ते लागू होईल. रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ स्वस्त दरांत मिळते. तांदूळ तीन रूपये किलो तर गहू दोन रूपये किलो दराने मिळतो.