मथुरा : येथील कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणची शाही इदगाह मशीद काढण्याच्या मागणीसाठी येथील न्यायालयात तिसरी याचिका दाखल झाली आहे. वाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) नेहा भदौरिया यांच्या न्यायालयात ही  याचिका दाखल करण्यात आली.  शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समिती व श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान यांच्यातील जमीन करार रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. विराजमान ठाकूर केशवदेव महाराज यांच्या जमिनीवर बांधलेली मशीद काढून ती दुसरीकडे हलवावी हा याचिकेतील मुख्य मुद्दा आहे.

Story img Loader