देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध सक्षमपणे लढा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. तर भाजपा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे राज्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे. तर राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा दुसरा वाद आहे. त्यात भाजपा सत्तेत नसलेल्या राज्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप भाजपा विरोधी पक्ष वारंवार करत आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याने राज्यातील करोना स्थितीत येणाऱ्या अडचणी दूर होतील अशी आशा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.

Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
bjp candidates first list for upcoming lok sabha elections likely to be announced in next two three days
भाजपची पहिली यादी तीन दिवसांत? केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक
Narendra Modi Sharad Pawar
“यूपीए सरकारचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, पण ते पैसे…”, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली ‘ही’ विनंती

राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३७ हजार ३८६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घऱी सोडण्यात आलं आहे. राज्यात एकूण ६ लाख ५४ हजार ७८८ करोना रुग्ण अॅक्टिव्ह आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.३६ टक्के इतकं आहे. तसेच करोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

करोना स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती.