देशात करोनाबाधितांच्या प्रमाणात सातत्याने दुसऱ्या दिवशी वाढ झालेली पहायला मिळली. त्यानुसार, शुक्रवारी करोनाची ६८,८९८ नवी प्रकरणं समोर आली. तर बाधित रुग्णांची संख्या २९ लाखांच्या पार पोहोचली. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, बाधित रुग्ण बरे झाल्याची संख्या सुमारे २१ लाखांवर पोहोचली असून तपासण्यांमध्येही वाढ झाली आहे.

शुक्रवारी सकाळच्या अद्ययावर माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९८३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५४,८४९ झाली आहे. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या वाढून २९,०५,८२४ झाली आहे. यांपैकी ६,९२,०२८ लोकांवर उपचार सुरु आहेत. तसेच २१,५८,९४७ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

चोवीस तासांत ९ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात २० ऑगस्टपर्यंत एकूण ३ कोटी ३४ लाख ६७ हजार २३७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यांपैकी गुरुवारी एका दिवसांत ९,१८,४७० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर आठ टक्क्यांपेक्षा कमी आहे.