करोना काळातही सामाजिक भान जपत देशाच्या मदतीसाठा धाव घेणाऱ्या टाटा कंपनीने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे. करोनाचा फटका बसलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलने सोशल सुरक्षा योजना जाहीर केली आहे. यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६० वर्ष सेवा पूर्ण होईपर्यंत वेतन देण्याचा निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे. याशिवाय मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उलचणार असल्याचंही जाहीर केलं आहे. टाटा स्टीलने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

टाटा स्टीलने काय म्हटलं आहे –
करोना महामारीत दुर्दैवी मृत्यू झालेल्या आमच्या प्रिय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या पाठीशी टाटा स्टील भक्कमपणे उभं आहे. टाटा स्टीलची उत्कृष्ट दर्जाची सामाजिक सुरक्षा योजना त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित करण्यास मदत करेल. यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ६० वर्ष सेवा पूर्ण होईपर्यंतचा पगार मिळणार आहे. ज्यामध्ये मेडिकल तसंच हाऊसिंग सुविधाही उपलब्ध असतील असं टाटा स्टीलने सांगितलं आहे.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

टाटांनी पुन्हा करुन दाखवलं!; रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

याशिवाय पहिल्या फळीतील सर्व कर्मचारी ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांच्या मुलांच्या पदवी शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च उचलणार आहोत असंही टाटा स्टीलने सांगितलं आहे.

कंपनीने नेहमीच आपल्या भागधारकांना पाठिंबा दिला असून त्यांच्यासाठी ढाल म्हणून उभी राहिली आहे. यावेळीही काही वेगळं नाही. टाटा स्टील कुटुंब आपल्या सर्व लोकांसोबत असून त्याच्या सुरक्षा आणि सुखी जीवनासाठी कटिबद्ध असल्याचं टाटा स्टीलने म्हटलं आहे.

टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवठा
टाटा स्टीलकडून देशात २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. “करोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे.