अयोध्यामध्ये पुन्हा एकदा राम मंदिराची उभारणी न झाली नाही तर आपल्या संस्कृतीची मुळं नष्ट होतील, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. भारतातील मुस्लीम समुदायाने राम मंदिर पाडले नाही. भारतीय नागरिक असं करू शकत नाहीत. भारतीयांचे मनोबल तोडण्यासाठी विदेशी शक्तींनी हे मंदिर पाडल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आज आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला नष्ट केलेले मंदिर पुन्हा उभा करण्याचा अधिकार आहे. कारण ते फक्त मंदिर नाही तर आपल्या अस्तित्वाचे ते प्रतीक होते. जर अयोध्येत राम मंदिरा पुन्हा उभा केले नाही तर आपल्या संस्कृतीची मुळं नष्ट होतील. आधी जिथे मंदिर होते, तिथेच ते उभारले जाईल, यात कोणतीच शंका नाही, असा दावाही त्यांनी केला.

विरोधी पक्षांवर निशाणा साधला. देशात नुकताच झालेल्या जातीय हिंसाचारास विरोधक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांची दुकानं बंद झालीत (निवडणुकीतील पराभव) ते लोक आता जातीच्या मुद्द्यावर लोकांना भडकावत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

अयोध्यातील राम मंदिरावरून देशात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी याप्रकरणी दोन्ही पक्षांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता.

[jwplayer 35hSyvuY-1o30kmL6]

Story img Loader