पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ असे या पुरस्काराचे नाव असून दक्षिण कोरियातील द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) याची बुधवारी घोषणा केली.


पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्वीट केले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलल्याने आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे मोंदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत. याचीही मोदींच्या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, नुकतेच २६ सप्टेंबर रोजी न्युयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण आमसभेत मोदींना ‘चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ हा पर्यावरण विषयक पुरस्कार जाहीर झाला होता. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला होता.

Story img Loader