माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीची तपासणी सुरु आहे. रात्री ८ वाजता तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती सुत्रांकडून कळते. याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे बऱ्याच काळापासून आजारी आहेत. भाजपाच्या संस्थापकांपैकी एक असणारे वाजपेयी ३ वेळा पंतप्रधान राहिले आहेत. ते पहिले असे बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत, ज्यांनी आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.