करोना काळत गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान, पुन्हा उत्तर प्रदेशातून एक वेदनादायी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर पुरलेले अनेक मृतदेह पाण्याची पातळी वाढल्याले पाण्यावर तरंगत आहेत. हे मृतदेह करोना रुग्णांचे असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. जशी-जशी पाण्याची पातळी वाढत आहे. तसे मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृतदेहांचे फोटो व्हायरल होत आहेत. काही मृतदेहांच्या हातात सर्जिकल ग्लोज दिसत आहेत. या मृतदेहांना प्रयागराज मनपाच्या पथकाने बाहेर काढले आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

मनपाचे लोक मृतदेहांवर करीत आहेत अंतिम संस्कार 

प्रयागराज महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी नीरज सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, “आम्ही पूर्ण विधी आणि कर्मकांडांनी मृतदेह अंत्यसंस्कार करीत आहोत.”

हेही वाचा- उत्तर प्रदेश : करोना रुग्णाचा मृतदेह पुलावरुन नदीमध्ये फेकणाऱ्यांची ओळख पटली; गुन्हा दाख

ते म्हणाले, “करोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रयागराजमधील गंगेच्या काठावर संपूर्ण स्मशानभूमीचे चित्र निर्माण झाले होते. काही हिंदू लोक अल्पवयीन मुले, अविवाहित मुली आणि इतर मृतदेह याठीकाणी दफन करीत असतात. पण गंगेच्या काठी अशी परिस्थिती कधीच आली नाही. पाऊस आणि नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मृतदेह तरंगत आहेत. मनपाचे लोक स्वत: या मृतदेहांवर अंतिम संस्कार करीत आहेत.”

प्रयागराज नगराध्यक्षा अभिलाषा गुप्ता नंदी यांनी माध्यमांना सांगितले की, “मृतदेह दफन करणे ही अनेक समाजात एक परंपरा आहे. मृतदेह जमिनीत विघटित होतात पण ते वाळूमध्ये होऊ शकत नाहीत. दरम्यान, ‘जिथे जिथे आपल्याला मृतदेह आढळत आहेत. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.”