करोनाशी सुरु असलेल्या लढ्यात केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली असून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउन असल्याने पुढील २१ नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र या लॉकडाउनदरम्यान कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार हे जाणून घ्या…
१) खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
My fellow citizens,
THERE IS ABSOLUTELY NO NEED TO PANIC.
Essential commodities, medicines etc. would be available. Centre and various state governments will work in close coordination to ensure this.
Together, we will fight COVID-19 and create a healthier India.
Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
२) किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या
३) प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया
By converging around shops, you are risking the spread of COVID-19.
No panic buying please.
Please stay indoors.
I repeat- Centre and State Governments will ensure all essentials are available. https://t.co/bX00az1h7l
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
४) टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
५) बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
६) शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
७) खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
८) उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
९) रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
१०) टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा
११) पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था