‘अम्मा मिनरल वॉटर अॅण्ड कॅण्टीन प्रोग्राम’ या राज्य सरकारच्या योजना असून त्यांचा मुख्यमंत्री जयललिता यांना संबोधण्यात येणाऱ्या ‘अम्मा’शी सुतराम संबंध नाही, अशी भावार्थ याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
तामिळ भाषेत अम्मा याचा अर्थ आई किंवा देव असा असून महिला अथवा मुलांनाही त्या नावाने संबोधण्यात येते. त्यामुळे सरकारी योजनांना जयललिता यांचे नाव देण्यात आले असल्याचा अर्थ लावला जाऊ नये, असे याचिकाकर्ते वाराकी यांनी म्हटले आहे.
जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ जयललिता या नावाने घेतली आहे, अम्मा या नावाने नव्हे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अधिक उजळ व्हावी यासाठी सार्वजनिक निधीचा वापर करण्यात येत असल्याचे म्हणणे निराधार आहे. तळागाळातील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या या कल्याणकारी योजना आहेत, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
माजी पंतप्रधान स्व. पं. जवाहरलाल नेहरू, स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांच्या नावाच्या केंद्र सरकारच्या ४६१ योजना आहेत.