‘‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी माझी तुलना करणे चुकीचे आहे. मी मध्य प्रदेशात काम करीत आहे आणि त्यापलीकडे मला कशातही रस नाही,’’ असे स्पष्ट करून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील स्थानाबद्दलच्या चर्चाना पूर्णविराम दिला.
अलीकडेच मोदी यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली. चौहान यांना मात्र कार्यकारिणीत कोणतेही स्थान देण्यात आले नाही. त्याबद्दल पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना चौहान यांनी हे उद्गार काढले. तत्पूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, भाजप राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा