गुजरातमधील जुनागढ येथे दर्गा हटवण्यावरून हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत १ जणाचा मृत्यू, तर चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १७४ जणांना अटक केली आहे. जमावाने पोलीस चौकीची तोडफोड करत वाहनांना आग लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

जुनागढ येथे माजेवाडी गेटसमोर असलेला दर्गा अनधिकृत असल्याची नोटीस महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बजावली होती. जागेच्या मालकीबाबत कागदपत्रे सादर करा, अन्यथा दर्गा हटवण्यात येईल, असं महापालिकेने नोटीशीत म्हटलं होतं. यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही नोटीस दर्ग्याच्या बाहेर लावण्यासाठी महापालिका अधिकारी शुक्रवारी पोहचले, तेव्हा अचानक २०० ते ३०० जणांचा जमाव एकत्र आला. त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा : “चीनशी लढण्याची ताकद नाही, म्हणून…”, मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

या घटनेत पोलीस उपअधिक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर, एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक रवी तेजा वासमसेट्टी यांनी सांगितलं की, “माजेवाडी गेटजवळील दर्ग्याला महापालिकेने ५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. शुक्रवारी अचानक तिथे ५०० ते ६०० लोक जमले होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण, रात्री १०.१५ च्या सुमारास जमावाने पोलीस आणि नागरिकांवर दगडफेक केली.”

हेही वाचा : विरोधकांच्या ऐक्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता;नितीशकुमार यांचा दावा

“तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रू धुरांचा वापर केला. १७४ जणांना ताब्यात घेतलं आहे,” अशी माहिती रवी तेजा वासमसेट्टी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 dead 174 detained in clashes over illegal dargah in junagadh gujrat ssa
Show comments