कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या एका वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस ठार, तर तिघे जखमी झाले. हे वाहन कारागृहातून कैद्यांना घेऊन जात असताना कैरो-फेयूम मार्गावर दहशतवाद्यांनी त्यावर गोळीबार केला. यात एक पोलीस ठार झाला, तर तीन जवान जखमी झाले, असे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला असून ते हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यादरम्यान कुणीही कैदी पळून गेला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
जानेवारी २०११ मध्ये तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक यांची राजवट उलथून टाकण्यात आल्यानंतर इजिप्तमध्ये दहशतवाद्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इस्लामवादी माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्याविरुद्ध देशभरात व्यापक निदर्शने झाल्यानंतर २०१३ साली सैन्याने त्यांना पदावरून हटवल्यानंतर पोलीस आणि सैन्य यांना लक्ष्य करणारे हे हल्ले वाढले आहेत. तेव्हापासून ६०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी मरण पावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा