जम्मू काश्मीर येथील अनंतनागमध्ये पोलीस आणि दहशवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आलेली नाही. जखमी पोलिसाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येते आहे.

याआधी १ सप्टेंबरलाही बंदिपुरा सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. शनिवारी म्हणजेच १ सप्टेंबरला झालेल्या कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त केला. किलो फोर्स या भारतीय जवानांच्या तुकडीचाही या कारवाईत समावेश होता. या कारवाईत दोन जवान जखमी झाले होते.

Story img Loader