बंगळूरु : भाजप सदस्यांच्या गदारोळामुळे कर्नाटक विधानसभेत बुधवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. भाजप सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडून विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्राप्पा लामनी यांच्यावर भिरकावल्या. यामुळे दहा सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. ३ ते २१ जुलै या कालावधीत हे अधिवेशन होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरोधकांच्या बंगळूरु येथील बैठकीवेळी विविध नेत्यांच्या स्वागतासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत भाजपने हौदात धाव घेतली. या गोंधळात पाच विधेयके संमत करण्यात आली. विधेयके संमत झाल्यावर विधानसभा अध्यक्ष यू.टी. हैदर यांनी कामकाज तहकूब न करता अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी गदारोळ केला. त्यात काही सदस्यांनी विधेकाच्या प्रति फाडून उपाध्यक्षांवर भिरकावल्या. दलित असल्यानेच भाजप सदस्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप लामनी यांनी केला. दरम्यान, भाजप तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाने विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. तसेच सभागृहाबाहेर निदर्शने करणारे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.