Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जात असताना झालेल्या अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे भाविक प्रवास करत असलेली कार बस धडकल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून प्रयागराज-मिर्जापुर महामार्गावर मेजा भागात बोलेरो कार बसला धडकल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून प्रयागराज येथील संगमावर स्नान करण्यासाठी हे भाविक जात होते. भाविकांना घेऊन जाणारी बोलेरोची मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून येणार्‍या बसशी धडक झाली. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अपघाताची तात्काळ दखल घेतली असून अधिकार्‍यांना तातडीने मदतकार्य करण्याच्या तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात महाकुंभमेळ्यावरून परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर दोघे जखमी झाले होते.

यापूर्वी २९ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला होता. मौनी अमावस्येच्या निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी एकाच वेळी मोठ्या संख्यने भाविक एकाजागी आल्याने संगम परिसरात पहाटेच्या वेळी बी चेंगराचेंगरी झाली होती. महाकुंभ १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारी रोजी याची सांगता होणार आहे.