पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन लहान मुलांसह १० जण ठार झाले आहेत.
पाकिस्तानच्या पूर्वेकडील शहरात असलेल्या शाह जमाल, जालू मोर, वॉल्टन रोड, अमीन सोसायटी आणि गुज्जरपुरा येथे मुसळधार पावसामुळे पाच इमारती कोसळल्या. दगडमातीच्या ढिगाऱ्याखालून दोन मुले, महिलांसह नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकूण २३ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, हरबंसपुरा येथे सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून नऊ वर्षांचा एक मुलगा ठार झाला. मान्सूनपूर्व पावसाने पाकिस्तानला झोडपले असून शनिवारीही मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे वृत्त आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचेही वृत्त आहे.

Story img Loader