10 months Girl Rape : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं ही घटना त्यांच्या शाळेत घडली. ज्यानंतर जनक्षोभ उसळला. या घटनेतल्या अक्षय शिंदेला ठार करण्यात आलं. ही घटना ताजी असतानाच एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. १० महिन्यांच्या मुलीवर बलात्कार ( 10 Months Girl Rape ) करण्यात आला आहे. रविवारी ही मुलगी अंगणात खेळत होती. तेव्हा तिच्या घरी नेहमी येणाऱ्या एका ३० वर्षीय माणसाने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात शेजाऱ्यांनी या नराधमाला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या मुलीला तो माणूस खेळवत खेळवत घरी घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार ( 10 Months Girl Rape ) केला.
कुठे घडली ही घटना?
गुजरातमधल्या भरुच या ठिकाणी ही घटना घडली आहे. ३० वर्षांचा हा माणूस त्या दहा महिन्यांच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी मुलीची आजी त्या माणसाच्या घरी गेली. तिने पाहिलं की मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. यानंतर सगळेच तिथे आले. त्यांनी आरोपीला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पॉक्सो ( 10 Months Girl Rape ) कायद्याच्या अंतर्गत आणि इतर कलमांखाली या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा- नालासोपार्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, एका आरोपीला अटक
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपीचं नाव दीपक असं आहे. दीपक या लहान मुलीच्या घरी कायमच येत-जात होता. तसंच तो तिला उचलून घ्यायचा, तिला खेळवायचा. समोर आलेल्या माहितीनुसार या मुलीची आई एका रेस्तराँमध्ये काम करते. ही मुलगी जेव्हा अंगणात खेळत होती तेव्हा दीपक तिला उचलून घरात घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार ( 10 Months Girl Rape ) केला.
पोलिसांनी या प्रकरणात काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी आणि पीडिता यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी हे देखील सांगितलं की या प्रकरणात दीपक जेव्हा तिला घरी घेऊन गेला त्यानंतर काहीवेळातच या मुलीच्या रडण्याचा आवाज आला. या मुलीच्या आजीने धावत दीपकचं घर गाठलं. त्यानंतर मुलीला पाहिलं तर ती रडत होती, तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त ( 10 Months Girl Rape ) येत होतं. दीपक शांतपणे उभा होता. आजीने आरडा ओरडा केला तेव्हा शेजारीही जमा झाले. शेजाऱ्यांना घडलेला प्रकार ओळखायला वेळ लागला नाही. त्यांनी तातडीने या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.