छत्तीसगढ येथील तेलंगणा सीमेवर मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येते आहे. या चकमकीत १२ माओवादी ठार झाले आहेत. विशेष माओवादी विरोधी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये त्यांचे काही मोठे नेते असण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. ग्रेहाऊंड्सची ही कारवाई अजूनही सुरु आहे. तेलंगण सीमेवरील गोदावरी नदीलगत असलेल्या पुजारी कांकेर जंगलात ही चकमक सुरु आहे. तर एक जवान शहीद झाला आहे अशीही माहिती समोर येते आहे. तसेच १२ माओवाद्यांमध्ये ६ महिलाही असल्याची समजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माओवादी नेता हरिभूषण हा या चकमकीत ठार झाला आहे. तर तीन जवानही जखमी झाल्याचे समजते आहे. या जवानांना हेलिकॉप्टरने भद्राचलमला येथे उपचारांसाठी हलवण्यात आले आहे अशीही माहिती समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माओवाद्यांनी काही भागात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य केले होते. दंतेवाडा या ठिकाणी पोलीस आणि माओवाद्यांच्या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले होते. त्यामुळे माओवाद विरोधी पथकाला मिळालेले हे मोठे यश आहे मानले जाते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 naxals were killed in a joint operation by telangana police and chhattisgarh police in pujari kanker in bijapur district