राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील.

जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे –

१) द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी राजघाटला भेट देत राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
institutions values and provisions in indian constitution
संविधानभान : आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही

२) शपथविधी सोहळ्याआधी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू संसदेत पोहोचतील.

३) याशिवाय राष्ट्रपती भवनात सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी एक औपचारिक कार्यक्रम पार पडेल. पण जर पाऊस असेल तर हा कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचं शपथविधीच्या वेळापत्रकात नमूद आहे.

४) उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि प्रमुख नागरी व लष्करी अधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

५) रविवारी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री परिषदेतील सदस्यांसाठी राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन केलं होतं.

६) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

७) द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर ओडिशामधील त्यांच्या गावी गुरुवारपासूनच मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जात आहे.

८) द्रौपदी मुर्मू २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

९) द्रौपदी मुर्मू दोन वेळा आमदार राहिल्या असून ओडिशात भाजपाच्या पाठिंब्याने बिजू जनता दलाची सत्ता असताना नवीन पटनाईक सरकारमध्ये मंत्री होत्या.

१०) द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यासारखी मंत्रालयं हाताळताना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.

Story img Loader