Arpita Mukherjee News in Marathi: पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याला बुधवारी नवं वळण मिळालं जेव्हा सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींच्या रोख रक्कमेसहीत २९ कोटींची संपत्ती ताब्यात घेतली. बेलघराई येथील घरावर मारलेल्या छाप्यामध्ये ही संपत्ती ईडीच्या हाती लागली आहे. रात्री छापा टाकण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरु होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या. कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. या छापेमारीनंतर भाजपेच्या दिलिप घोष यांनी हे प्रकरण जुनं असलं तरी ज्या पद्धतीने तपासाला वेग आला आहे ते पाहता यामधून कोणीही वाचू शकणार नाही असं म्हटलंय. “पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा तपास मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. पार्थ हे सहजासहजी बोलणार नाहीत. पण अर्पिता यांनी माहिती देण्यास सुरुवात केलीय आणि आम्ही हे सारं ऐकतोय,” असं घोष यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा