पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ३० हजार नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी योगा आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरेल, याची दहा कारणे सांगितली.
* आपल्याकडे जुन्या काळात आरोग्य विमा नव्हता. पण योगाचा सराव व्यक्तीला आरोग्याची हमी देणारा ‘झिरो बजेट’ विमा होता.
* आपल्या मोबाईल फोनप्रमाणे आयुष्यात योगाला समाविष्ट करून घ्या.
* योगा हे व्यवसायाचे उत्तम साधन बनू शकते आणि त्यामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो.
* योग करणे गर्भवती स्त्रीयांच्या आरोग्याला लाभदायी असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांनीही मान्य केले आहे.
* सध्याचा काळात आपले स्वत:शी असलेले नाते तुटलेले आहे. योगा हे नाते पुन्हा जोडण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
* योगा फक्त आजारांवर मात करण्यासाठी नसून तो आनंदाची गुरूकिल्ली आहे.
* योग हा केवळ क्रिया नसून शरीराला सुदृढ ठेवण्याची प्रक्रिया आहे.
* योगामुळे आपण मधुमेहासारख्या आजारांवर मात करू शकतो.
* योग काही मिळविण्याचा नव्हे तर मुक्त होण्याचा मार्ग आहे.
* योग आस्तिक आणि नास्तिक दोन्ही लोकांसाठी आहे.
* योग गरीबांसाठी आहे आणि श्रीमंतांसाठीही आहे.