वसतीगृहात राहणाऱया चार अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर १० ते १५ जणांच्या समुहाने सामुहिक बलात्कार करण्याची घटना झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील लिटीपारा भागामध्ये घडली. अल्पवयीन मुलींच्या शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पीडित चारही मुली या पाकूर आणि साहिबगंज या दोन जिल्ह्यांमधील रहिवासी आहेत. जामजुरी गावातील एका शाळेच्या आवारातील वसतीगृहामध्ये त्या राहतात. चौघींपैकी दोघीजणी या तिसऱया इयत्तेत शिकत असून, उर्वरित दोघी या त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत. पीडित चारही मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे पोलिस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सर्व आरोपी संबंधित वसतीगृहामध्ये गेले. चार मुलींना तेथून बाहेर नेऊन त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोन तासांनी पीडित मुली वसतीगृहामध्ये परतल्यावर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

Story img Loader