इराण-पाकिस्तानच्या सीमेनजीक झालेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपाने मंगळवारी अवघ्या दक्षिण आशियाला हादरवून सोडले. यात इराणमध्ये ४० हून अधिक जणांचा तर पाकिस्तानात १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या भूकंपात किमान शंभर जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास झालेल्या  भूकंपाचे हादरे भारतासह अवघ्या दक्षिण आशिया व आखाती देशांत जाणवले. पाकिस्तानच्या सीमेपासून ४८ किमी अंतरावर इराणमधील खश प्रांतातील सारवान या दुर्गम भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पाकिस्तानातही बलुचिस्तान प्रांतातील खरन जिल्ह्यात १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.  या भूकंपाने भारतातील नवी दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि गुजरात या राज्यांतही सौम्य धक्के जाणवले.

Story img Loader