सागरमाला प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी शंभर आरामदायी जहाजे (क्रूझ) आणण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.

सागरमाला प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घघाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. देशातील सर्व बंदरे जोडण्याचा हा प्रकल्प असून त्यामध्ये बारा लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या प्रकल्पांतून दोन कोटी रोजगारनिर्मिती होण्याचाही विश्वस त्यांनी व्यक्त केला.

पणजीमध्ये मांडवी नदीत असलेल्या Rूझसेवेच्या धर्तीवर मुंबईत सेवा उपलब्ध करून दिली जाईल. ही आलिशान जहाजे वीस मजली असतील आणि त्यामध्ये २५ ते ३० हॉटेल्सची व अन्य सोयीसुविधांची रेलचेल असेल. मुंबईबरोबरच गोव्यात आणि कोचीनमध्येही साठ Rूझ उपलब्ध केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये (बीपीटी) आठशे कोटी रूपये खर्चून प्रवाशी टर्मिनल, भाऊच्या धक्कय़ापासून नेरळपर्यंत कार वाहून नेणारी फेरी सेवा, जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) ते मनमाड रेल्वे जोड आदींचीही माहिती त्यांनी दिली.

यावेळी गडकरींनी नोटाबंदीच्या निर्णयमचे जोरदार समर्थन केले. बँका व एटीएमसमोरील रांगा कमी झाल्याचाही दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 luxurious ships for mumbai says nitin gadkari