निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशपातळीवरील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. निवडणुकीच्या अगोदर आता नेते मंडळींकडून मोठमोठी विधानं केली जात आहेत. शिवाय, अनेक मंत्री, आमदारांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षात प्रवेश करण्याचे सत्र देखील सुरू झाले आहे. उत्तरप्रदेशात नुकत कॅबिनेटमंत्री मौर्य यांनी भाजपाल सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आहे. तर, गोव्यात देखील भाजपाचे मंत्री मायकल लोबो यांनी पक्षत्याग केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्शभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी “भाजपा समाजमाध्यमं किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ओपिनियन पोलच्या माध्यमातून ज्या अफवा पसरवतोय, त्यावर विश्वास ठेवू नका. गोव्यात आणि उत्तरप्रदेशमध्ये १०० टक्के परिवर्तन होतय, हे तुम्ही लिहून ठेवा.” असं विधान केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आज उत्तरप्रदेशात परिवर्तन निश्चित असल्याचं म्हटलेलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा